Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Song of Solomon Chapters

Bible Versions

Books

Song of Solomon Chapters

1 शलमोनाचे सर्वांत सुंदर गीत
2 चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
3 तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
4 मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
5 यरुशलेमच्या मुलींनो, मी काळी आणि सुंदर आहे. मी तेमान आणि शलमोनाच्या तंबूंसारखी काळी आहे.
6 मी किती काळी आहे, सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका. माझे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली. त्यामुळे मला स्वत:चीकाळजी घेता आली नाही.
7 मी माझ्या आत्म्यासकट तुझ्यावर प्रेम करते. मला सांग: तू तुझ्या मेंढ्यांना कुठे खायला दिलेस? तू त्यांना दुपारी कुठे विश्रांती घेऊ दिलीस? मी तुझ्याबरोबर यायला हवे. नाही तर मी तुझ्या मित्रांच्या मेंढ्यांची काळजी घेणारी, अशी भाडोत्री स्त्रीसारखी ठरेन
8 तू खूप सुंदर स्त्री आहेस. काय करायचे ते तुला नक्कीच माहीत आहे. मेंढ्यांच्या मागे मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूंजवळ खाऊ घाल.
9 फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडीजशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस.त्या घोडड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत.
10 हे तुझ्यासाठी केलेले अलंकार: डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे.
12 माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो.
13 माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे
14 माझा प्रियकर एन - गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे.
15 प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
16 प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरुच्या लाकडाच्या आहेत. छताचे वासे देवदारुच्या लाकडाची आहे.

Song of Solomon Chapters

Song of Solomon Books Chapters Verses Marathi Language Bible Words display

COMING SOON ...

×

Alert

×